मुख्य सामग्रीवर वगळा

जिल्हाधिकारी अजित कुंभारे यांचे प्रतिपादन.




•   कालबाह्य वाईट रूढी परंपरांना तिलांजली देऊन एकल महिलांनी प्रगती करणे काळाची गरज!!

•  एकल महिला परिषद व परिचय मेळावा संपन्न. 

अकोला. 

एकल महिला सन्मान चळवळ अंतर्गत एकल महिला परिषद व परिचय मेळावा महिला व बाल विकास विभाग अकोला, माणस फाउंडेशन,सेवाधर्म शिक्षण व बहुउद्देशीय संस्था अकोला,एन्करेज एज्युकेशनल फाऊंडेशन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिला परिषद व परिचय मेळावा जानोरकर मंगल कार्यालय, कौलखेड अकोला येथे संपन्न झालेल्या या मेळाव्याला उद्घाटनिय  मार्गदर्शन करताना जुन्या वाईट चालीरीती रूढी परंपरा अंधश्रद्धा यांना तीलाजली देऊन एकल महिलांनी आपला सर्वांगीण विकास करून घेण्याची गरज आहे . कोणत्याही वाईट प्रसंगाला न घाबरता शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा त्यासाठी शासन आपल्या नेहमी पाठीशी राहील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. या मेळाव्यात जिल्ह्यातील एकल महिला त्यांचे प्रश्न समस्या विवंचना, सक्षमीकरण, शासन योजना, पुनर्वसन आदी विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शक केले .तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आले. सदर   मेळाव्याचे उ‌द्घाटक मा.श्री. अजित कुंभार जिल्हाधिकारी, अकोला यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी सौ अनिता गुरव  जिल्हा महिला व बाल विकास  समिती अकोला यांनी भुसवले .या मेळाव्याची प्रास्ताविक. श्री दत्तात्रय श्रीरामजी लहाने, मानस फाऊंडेशन बुलढाणा यांनी केले असून या कार्यक्रमाला त्यांनी महिलांच्या समस्यांविषयी व विकासाविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री. गिरीश पुसदकर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अकोला, श्रीमती रजिया सुलताना बुलढाणा ,मा. आरती टाकळकर सामाजिक कार्यकर्त्या  एकल महिला परिषद व परिचय मेळावाला विशेष सहकार्य व मार्गदर्शन मा. श्री. नरेश मानकर ,मा. डॉ. नेहा मानकर, तुषार हांडे, मा. प्रा. शिवराम बावस्कर, मा. श्री. गजानन हरणे समाजसेवक, मा. श्री. राजू लाडूलकर (डी.सी.पी.यु.), मा. श्री. सुनील लाडूलकर, मा.. श्री. सुनिलभाऊ वनारे ,मा. श्रीमती रुपाली पांडे (जिल्हा संरक्षण अधिकारी)  यांचे लाभले आहे.एकल महिला सन्मान चळवळ अंतर्गत एकल महिला परिषद (विधवा, परितक्त्या, घटस्फोटित) व परिचय मेळाव्याचे आयोजन महिलांना सक्षम बनवणे या दृष्टीने आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच केले  होत .सदर परिषदेचा मुख्य उद्देश विधवा, घटस्फोटित महिलांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना सक्षम बनवण्या करता सहकार्य करणे,रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. आत्मनिर्भर होण्याकरता समुपदेशन करणे,शासकीय योजनांची माहिती करून देणे,

समाजात मूल असणाऱ्या महिलांनी पुनर्विवाह करू नये, असा समज प्रचलित आहे. तरी सामाजिक पुनः एकात्मिकरणं आणि पारिवारिक सुरक्षित आधार मिळण्याच्या दृष्टीने पुनर्विवाह करण्यासाठी प्रोत्साहीत करणे आदी उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या एकल महिला परिषद व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थित असलेल्या सर्व महिला पुरुषांनी शपथ घेऊन एकल महिलांचां मान सन्मान ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची शपथ घेतली. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ, आदींच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले . या मेळाव्याला अकोला जिल्ह्यातील एकल महिलांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. शासनाच्या विविध योजना समजून घेतला व फॉर्म भरून घेतले. एकल महिलांच्या विकासात्मक अनेक ठराव  पास करण्यात आले. कार्यक्रमाचे  संचालन प्रतिभा भुतेकर, आभार प्रदर्शन नरेश मानकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरता तुषार हांडे, गजानन हरणे,महेंद्र गणोदे , प्रमोद धर्माळे, सुनील वानरे ,शुभांगी लावुडकर यांच्यासह विविध सामाजिक संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम शांततेत परंतु उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचा शेवट स्नेहभोजनाने करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...