• शैक्षणिक क्षेत्रात कंचनपूर गाव प्रेरणादायी करण्याची संकल्पना : ज्ञानेश्वर मांडेकर
अकोला :
जिल्हा परिषद कंचनपूर शाळेत सन१९९०ते १९९५ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यानी शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता माजी विद्यार्थीनी दि .९ मार्च २५ ला शिक्षक -विदयार्थी मेळावा आयोजित केला.
या मेळाव्यात विदयार्थ्याना ज्ञानर्जन करणारे तत्कालीन शिक्षक अब्दुल गनी पांडे , ज्ञानेश्वर मांडेकर,सुभाष फुकट,विजय देशमुख, दिंगबर अटकर, प्रताप वानखडे, व आज रोजी कार्यरत असलेले शरद शेगोकार आंमत्रित करण्यात येवून व्यासपीठावर विराज मानवर करण्यात आले ..
आज रोजी मिल्टीत,विधिज्ञ , बॅकिंग, व्यावसायिक, राजकीय पदाधिकारी,सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी,व्यापारी, गृहीणी, बचत गट , प्रतिष्ठीत अश्या विविध क्षेञात कार्यरत असलेले कंचनपूर शाळेतीलमाजी विद्याथ्यानी यांनी उत्स्फूर्तने शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करण्या करीता जिल्हा परिषद शाळेत मेळाव्याचे आयोजन केले होते .
शालेय जीवनातील मेळाव्याचे दिप प्रज्वलन करून रितसर उद्घाटन शिक्षका तर्फे करण्यात आले. तर मेळाव्याचे प्रास्ताविक सौ . प्रतिक्षा पागृत हिने सादर करीत विद्यार्थ्याच्या शालेय भावना व्यक्त करीत. आठवणीला उजाळा दिला तर अँड. कैलास अनमाने , CRPF नितीन ठाकरे, पोलीस पाटील विठ्ठल शेळके, यांनी शालेय जीवनातील संस्कारामुळे आम्ही आमच्या क्षेत्रात अग्रेसर आहोत या विषयी अनेक विविध मुदयाचे विश्वलेषण केले .
शाळेतील .माजी शिक्षक ज्ञानेश्वर मांडेकर यांनी विदयार्थी संस्कारक्षम घडवू शकलो हे श्रेय जि प . शाळेला (जि. प शाळा कंचनपूर ) ला दिले. आज समाजातील सकारात्मक बाबी विद्यार्थ्याच्या समोर सादर करून नवपिढीत विद्यार्थी प्रगत होण्या संबधी हितगुज करीत कंचनपूर गाव हे शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहण्या संबधी रुपरेषा संबधी सह संकल्पना व्यक्त केली . तर माजी शिक्षक अब्दुल पांडे, सुभाष फुकट, विजय देशमुख, दिंगबर अटकर, प्रताप वानखडे, शरद शेगोकार, अक्षय 'पागृत यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले .
गावातील शिक्षण प्रेमी बळीरामजी चोरे, अनेक प्रतिष्ठीत नागरीक माजी विदयार्थी सासुरवासिणी माहेरात शिक्षकासाठी आल्याने विद्यार्थानीच्या आईवडीलांनाचा वेगळाच आनंद दिसुन आला. शाळेतील माजी विदयार्थीनी- विदयार्थी अनेक वर्षानी कार्यक्रमा निमित्य शालेय परिसरात - शिक्षण घेतलेल्या वर्ग खोलीत एकञ आल्याने भुतकाळात आठवणीला उजाळाला मनोगता व्दारे व्यक्त करीत आनंद उपभोगला व जीवनातील उतार - चढाचा प्रत्यय जाणवला. कार्यक्रमाचे यशस्वी सुत्र- संचलन हभप शिवशंकर डिक्कर यांनी केले . तर आभार प्रदर्शन अँड. कैलास अनमाने यांनी केले. राष्टगीताने कार्यक्रमाची सांगता करून शेवटी सर्वानी स्नेह भोजनाचा आनंद घेवून परस्पराचा जड अंतकरणाने निरोप घेतला .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा