मुख्य सामग्रीवर वगळा





•  जागतिक महिला दिन 8 मार्च निमित्त विशेष वृत्त 

 •   भारतीय नाण्यांवर  आतापर्यंत  10 थोर महिलांची छायाचित्रे

•   राणी व्हिक्टोरिया यांच्या फोटोचे जगातील पहिले व शेवटचे 

•  सोन्याचे नाणे 1841   साली 

•  अक्षय करन्सीजचे संचालक अक्षय खाडे यांनी दिली माहिती 

अकोला :

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1985 ते 2024 पर्यंत एकूण 10 थोर महिलांची छायाचित्रे भारतीय नाण्यांवर छापण्यात आली आहेत. राणी व्हिक्टोरिया यांचे छायाचित्र असलेले जगातील पहिले आणि शेवटचे सोन्याचे नाणे 1841 सालात काढण्यात आले होते. या नाण्याचे वजन  10..66   ग्रॅम एवढे होते. यानंतर जगातील कोणत्याही देशाने सोन्याचे नाणे काढले नाही. अशी माहिती जागतिक व ऐतिहासिक मुद्रा आणि करन्सी संग्राहक तथा  " अक्ष करन्सीज  " चे संचालक अक्षय प्रदीप खाडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिली. याबाबत अधिक माहिती देताना अक्षय खाडे म्हणाले की, 1975 हे वर्ष युनोने " जागतिक महिला वर्ष  " म्हणून घोषित केले. त्यानंतर पहिला महिला दिन 8 मार्च 1943 रोजी मुंबईत साजरा करण्यात आला. चलनांवरील महिलांच्या छायाचित्राबाबत माहिती देताना अक्षय यांनी सांगितले की, 1975  साली भारत सरकारने दहा पैशांच्या चलनी नाण्यावर महिलेचे काल्पनिक चित्र काढून ते प्रसारित केले. त्यावर समानता, विकास, शांती हे स्लोगन छापण्यात आले होते. त्यानंतर 1980  साली 10  व 25  पैशांच्या नाण्यांवर महिलेचे काल्पनिक चित्र काढून त्यावर" ग्रामीण महिलाओ की प्रगती  " असे स्लोगन छापले होते. त्यानंतर माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची 1984 साली हत्या झाल्यानंतर 1985 साली 50 पैसे व पाच रुपयांचे नाणे काढून त्यावर इंदिरा गांधी यांचे छायाचित्र छापले होते. त्यानंतर एकदम 24 वर्षानंतर 2009  साली 5 रुपये  व 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर सेंट अल्फोंसा यांचे छायाचित्र छापण्यात आले. कॅथोलिक चर्च द्वारा संत उपाधी दिलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. यानंतर 2010  साली 5 रुपये व 100  रुपयांच्या विशेष नाण्यावर मदर टेरेसा यांचे छायाचित्र, 2014  साली 5 रुपये व 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर प्रख्यात गायिका व अभिनेत्री बेगम अख्तर यांचे छायाचित्र,2015  साली स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांच्या विरोधात लढलेल्याराणी गायी दिन्यालु यांचे छायाचित्र 5 रुपये व 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर छापण्यात आले होते. 2016   साली 5 रुपये व शंभर रुपयांच्या विशेष नाण्यावर प्रख्यात गायिका एम. एस. सुब्बू लक्ष्मी यांचे छायाचित्र, 2020   साली 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर श्रीमती विजया राजे सिंधिया यांचे छायाचित्र, 2023  साली 525 रुपयांच्या विशेष नाण्यावर संत मीराबाई यांचे छायाचित्र, 2023   सालीच 500 रुपयांच्या विशेष नाण्यावर राणी दुर्गावती यांचे छायाचित्र  व मागील वर्षी 2024 साली 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर सहज योगाच्या पुरस्कर्त्या निर्मलादेवी यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.   संपूर्ण जगात 200 पेक्षाही जास्त देश आहेत. त्यातील इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्युझीलँड यांच्या चलनी नोटांवर राणी एलिझाबेथ तसेच कॅनडातील नोटांवर व्हिओला डिस्मंड यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. इतरही काही 10 ते 15 टक्के देशांच्या नोटा व  नाण्यांवर त्या त्या देशातील थोर महिलांची छायाचित्रे छापण्यात आलेली आहेत. अशी ही माहिती अक्षय खाडे यांनी दिली आहे.

......................................

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...