• प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत
रेशीम शेती उद्योग कार्यशाळा
अकोला :
रेशीम शेती उद्योग हा कृषी संलग्नित रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा तसेच परकीय चलन उपलब्ध करणारा कमी कालावधीत अधिक लाभ मिळवून देणारा उद्योग आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास पूरक असून सध्याच्या वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी या उद्योगाची शेतकऱ्यांना हमखास मदत होऊ शकते. या आधारावरच स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभाग जिल्हा रेशीम कार्यालय व प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्ष म्हणून पितृ संस्थेच्या अध्यक्षा डॉ.तारा हातवळणे , प्राचार्य डॉ.जगदीश साबू प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रिया खिल्लारे कार्यक्रम समन्वयक डॉ.मिलिंद शिरभाते सह समन्वयक डॉ. निशा वराडे उपस्थित होते. कार्यशाळेचे बीज भाषण श्री हेमंत लाडगावकर असिस्टंट डायरेक्टर रिजनल सेरिकल्चर ऑफिस अमरावती यांनी केले. मलबेरी नर्सरी कल्टिवेशन मलबेरी प्लांटेशन सिल्क रियरींग ककुन हार्वेस्टिंग ग्रेडिंग अँड मार्केटिंग या विषयावर विद्यार्थ्यांनी रेशीम उद्योग कशा तऱ्हेने शेतकऱ्याला उत्तम लाभाचे स्त्रोत आहे हे पटवून सांगितले. तसेच प्रमुख वक्ते म्हणून श्री एस पी फडके जिल्हा रेशीम उत्पादक अधिकारी वाशिम यांनी तुतीची लागवड व रेशीम उद्योगामुळे शेतकऱ्यापर्यंत शेतीला पूरक असा जोडधंदा प्राप्त होऊन इतर पारंपारिक पिकाच्या तुलनेत अधिक उत्पादन कसे मिळू शकते व त्याचबरोबर ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर अल्पभूधारक शेतकरी सुशिक्षित बेरोजगार व महिलांना ग्रामीण भागातच रोजगाराचे साधन कसे उपलब्ध होऊ शकते यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ.श्रीकांत आहेरकर असोसिएट प्रोफेसर ऑफ एंटोमोलोजी (माजी) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी रेशीम उद्योग करताना कीडनियंत्रण व इतर प्रकारची रोग हे नष्ट कसे करता येईल यावर प्रकाश टाकला. पुढील सत्रात डॉ.रश्मी जोशी सावलकर सहाय्यक प्राध्यापक आर एल टी महाविद्यालय अकोला यांनी रिलिंग व ट्विस्टिंग करायचे तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन केले. श्री सुनील मानकर असिस्टंट जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय अकोला यांनी ककुन हार्वेस्टिंग या विषयावर शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राज्यातील वातावरण रेशीम उद्योगास पोषक असल्याचे दिसून आल्यामुळे तसेच रेशीम उद्योगाचा विकास करण्यात राज्याचा मोठ्या प्रमाणावर भाव असल्याने शासनाने रेशीम उद्योगाचा सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्यासाठी 1997 पासून वस्त्रोद्योग विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली रेशीम संचालनालयाची स्थापना करण्यात आली असून रेशीम उद्योग विकासाची जबाबदारी संचालनालयाकडे आहे असे मत कार्यशाळेत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निशा वराडे, प्रस्ताविक डॉ.मिलिंद शिरभाते तथा आभार प्रदर्शन डॉ.प्रिया खिल्लारे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी पार पडण्याकरिता श्री दिनेश बनसोड तसेच सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी प्रयत्न केले . कार्यशाळेचे प्रात्यक्षिक शिरला अंधारे येथील शेतामध्ये घेण्यात येणार असून वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा शिरला अंधारे येथे येऊन उपभोग घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केलेले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा