मुख्य सामग्रीवर वगळा

मिशन आयएएसतर्फे ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा


 मिशन आयएएसतर्फे ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर 

अमरावती :  स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकॅडमीच्या मिशन आयएएस  तर्फे येत्या उन्हाळ्यात 10 मे ते 16 मे यादरम्यान अमरावती येथे स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरासाठी 10 ते 20 हा वयोगट ठरविण्यात आला आहे. या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय व्यक्तिमत्व विकास मुलाखत तंत्र सराव परीक्षा याबाबत तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत .यामध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मिशन आय ए एसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिशन आयएएसच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे. 

     हे वर्ष मिशन आयएएसचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आतापर्यंत मिशन आयएएसच्या अशा प्रकारच्या शिबिराला गेल्या पंचवीस वर्षात जवळपास 273 आयएएस आयपीएस आयआरएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत. या शिबिराला महाराष्ट्रातील नामवंत आयएएस अधिकारी तज्ञ मार्गदर्शक तसेच यावर्षी आयएएस झालेले विद्यार्थी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरादरम्यान क्षेत्रभेट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या शिबिरात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी अमरावतीचे विभागीय आयुक्त अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावतीचे जिल्हाधिकारी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच मनपा आयुक्त या कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्या ठिकाणच्या सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटणार आहेत व चर्चा करणार आहेत. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांनी आतापासून तयारी केल्यास त्यांना भावी जीवनासाठी यश सुकर व्हावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

         गेल्या पंचवीस वर्षापासून मिशन आय ए एसचा हा उपक्रम सुरू असून या उपक्रमाचा लाभ आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. 2012  यावर्षी मिशनच्या या शिबिरामध्ये सुमारे 831 विद्यार्थी सहभागी झालेले होते. या शिबिरासाठी बाहेर जाऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांची अल्प दरात भोजन व निवास व्यवस्था संयोजकांनी केली असून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मिशनच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.

            या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे व आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार यांनी या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी येण्याचे मान्य केले असून अन्य निमंत्रितामध्ये सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी श्रीमती निधी पांडे सचिव श्री संजय बेलसरे जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार जिल्हाधिकारी श्री विपिन इटनकर श्रीमती संगीता महापात्र अपर जिल्हाधिकारी श्री स्वप्निल वानखडे महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव श्री जे पी डांगे नाशिकचे विभागीय आयुक्त श्री प्रवीण गेडाम संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यशदाचे महासंचालक श्री शेखर गायकवाड अमरावतीचे विभागीय पोलीस महानिरीक्षक श्री रामनाथ पोकळे जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद मनपा आयुक्त श्री सचिन कलंत्रे पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सचिव श्री सुधाकर मुरादे जिल्हाधिकारी श्री रवींद्र ठाकरे माजी जिल्हाधिकारी श्री अरुण कुमार डोंगरे जिल्हाधिकारी श्री आस्तिककुमार पांडे आयपीएस अधिकारी श्री पंकज देशमुख आरटीओ अधिकारी श्री ज्ञानदेव मोडक यशदाचे संचालक श्री रंगनाथ नाईकडे आयएएस अधिकारी श्री विशाल नरवाडे आयपीएस अधिकारी श्री लोहित मतांनी श्री पंकज कुमावत खंडविकास अधिकारी श्री अभिषेक कासोदे पोलीस उपयुक्त श्रीमती श्वेता खेडकर माजी जिल्हाधिकारी श्री पुरुषोत्तम भापकर अप्पर आयुक्त श्री प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त श्री अमित काळे पोलीस  उपायुक्त श्री नरेंद्र वानखडे उपविभागीय अधिकारी श्री संजय खडसे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.  

  या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून दरवर्षी चांगला प्रतिसाद प्राप्त होत असून या शिबिरात मार्गदर्शन घेऊन अनेक विद्यार्थी आज  आयएएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकारी झालेले आहेत. शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेचे धडे देणाऱ्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

                 •   प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे 

         संचालक,  मिशन आयएएस अमरावती कॅम्प                                mob.  9890967003

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...