मुख्य सामग्रीवर वगळा
होमिओपॅथीच्या रुग्णसेवेत सोशल इंजिनिअरिंगची गरज-डॉ.संदिप चव्हाण
      होमिओपॅथीक महाविद्यालयात             व्याख्यान संपन्न 
सुप्रसिद्ध होमिओपॅथीक तज्ञ डॉ.संदिप चव्हाण यांना विशेष सन्मानीत करण्यात आले

अकोला-आधुनिक व प्रगत होत चाललेल्या विज्ञान युगात वैद्यकीय वर्गाने रुग्णासोबत संवाद साधताना सोशल इंजिनिअरिंगची आवश्यकता असून आपल्या व्यवसायाचे ब्रँडिंग करताना अनेक पथ्य या दृष्टीने सांभाळण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ.संदिप  चव्हाण यांनी व्यक्त केले.

        होमिओपॅथिक एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित अकोट स्टॅन्ड रोडवरील होमिओपॅथिक महाविद्यालयात आयुष मंत्रालयाच्या निर्देशाने होमिओपॅथीचे जनक सर सेमीअल  हॅनेमन यांच्या जयंती पर्वावर दहा दिवसीय वैद्यकीय प्रबोधन कार्यक्रम बुधवारपासून प्रारंभ झाला. हा कार्यक्रम दिनांक 10 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे.              
                             

       होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ एस एस बुटे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या प्रारंभ सोहळ्याला उद्घाटक म्हणून राष्ट्रीय  होमिओपॅथीक संस्थान सदस्य, माजी केंद्रीय होमिओपॅथीक सदस्य डॉ.किशोर मालोकार, प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ.संदिप चव्हाण, होमिओपथीक एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.जयप्रकाश जयस्वाल, कोषाध्यक्ष व्ही एस जानी,प्राचार्य  डॉ.संजयकुमार तिवारी, संस्थेचे माजी अध्यक्ष  डॉ.तिलकराज सरनायक आदी उपस्थित होते. 
        सर हॅनेमन यांचे प्रतिमापूजन व मान्यवरांच्या स्वागताने या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. तर डॉ.संदिप चव्हाण यांना प्राचार्य डॉ.तिवारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, तसेच डॉ.मालोकार यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.बुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
          प्रमुख वक्ते डॉ.संदिप चव्हाण यांनी यावेळी उपस्थित होमिओपॅथी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत वैद्यकीय व्यवसाय करीत असताना कोणत्या बाबींचे पालन करावे, याचे सांगोपांग विवेचन केले. वैद्यकीय जगतात सफल होमिओपॅथी तज्ञ होण्यासाठी अनेक बाबींची काळजी करावी लागते. सर्वप्रथम या क्षेत्रात सोशल इंजिनिअरिंग करून रुग्णांशी भावनिक नाते तयार करावे लागते. 
        वैद्यकीय विश्व हे अत्यंत पवित्र क्षेत्र असून यामध्ये रुग्ण हा वैद्यकीय वर्गाला देवाची उपमा देतो. याची जाणीव ठेवून रुग्णांशी भावनिक नाते, नैतिकता, पारदर्शकता निर्माण करणे फार गरजेचे आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या मनात विश्वास निर्माण करत असतांना व्यवसायात साधेपणा,स्पष्टता व निरंतरता आवश्यक असून रुग्णांची मानसिकता ही सर्वप्रथम तपासणीसाठी आवश्यक असल्याचे मत डॉ.संदिप चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. 
        ते म्हणाले, रुग्णात सर्वप्रथम आपल्या पॅथीच्या संदर्भात विश्वासाहर्ता निर्माण करा. आपल्या व्यवसाय वाढीसाठी योग्य त्या प्रचार तंत्र, समाज माध्यमे व ( ए.आय. ) आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून उपयोग करून आपले क्षेत्र सुदृढ व विकसित करून नवनवीन संशोधने आत्मसात करून रुग्णांना आपल्या कसबी उपचाराने बरे करा. या पॅथीला विश्वासाचे हमखास प्रतीक करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
        यावेळी त्यांनी पॉवर पॉईंट द्वारे सुरेख विवेचन करीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय होमिओपॅथीक संस्थानचे सदस्य डॉ किशोर मालोकार यांनीही वैद्यकीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत उद्याचे सफल होमिओपॅथी तज्ञ असणाऱ्या विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग आधुनिक विज्ञानाशी सुसंगत होऊन या पॅथीला  बळकट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
       आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ बुटे  यांनी या उपक्रमाची माहिती दिली. दिनांक 10 एप्रिल पर्यंत होमिओपॅथिक महाविद्यालयात चालणाऱ्या या  कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने दि. 2 एप्रिल ला मटेरिया मेडिका सेमिनार  होणार असून यात डॉ.कल्पना धोटे आणि डॉ.उज्वला भटकर मार्गदर्शन करणार आहेत.             दि 4 एप्रिल रोजी पेरीओडिक टेबल ऑफ होमिओपथी यावर डॉ.जे डी पाटील यांचे व्याख्यान ,दि 6 एप्रिल ला ऑरगॅनॉन ऑफ मेडिसिनच्या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन डॉ. भिसे मॅडम करून होमिओपॅथी मटेरिया मेडिकाच्या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन  डॉ. धांडे व डॉ मोनिका तराळे करणार आहेत.                           होमिओपॅथिक शिबीर आणि जागरूकता मोहीम यावर डॉ. शाकिब आणि डॉ.सचिन धर्माधिकारी हे व्याख्यान देणार आहेत. 
        दि 7 एप्रिल रोजी डॉ.सॅम्युअल हॅनीमान यांच्या जीवनावर डॉ. कल्पना भिसे यांचे संबोधन, तर डॉ अरुण पंड्या यांचे केस प्रेझेन्टेशन विथ होमिओपथीक अप्रोच, डॉ.मिलिंद गद्रे हे होमिओपॅथिक फार्मसी  संदर्भात विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत.
        दि 8 एप्रिल रोजी डॉ हेमलता लद्दड यांच्या नियंत्रणात सांस्कृतिक कार्यक्रम, अस्मिता देशमुख आणि डॉ. हर्षलता कोले यांच्या नियंत्रणात पोस्टर व क्वीज स्पर्धा,दि 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता नरेंद्र श्रीवास यांच्या नियंत्रणात योगा आणि क्रीडा स्पर्धा होणार आहे.10 एप्रिल रोजी दु 3 वाजता डॉ रवी कुचर यांच्या उपस्थितीत सर सॅम्युअल हॅनेमन यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.
       यात सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या डॉ अस्मिता देशमुख, डॉ हर्षलता कोले यांच्या समन्वयात आयोजित या कार्यक्रमाचे संचालन डॉ स्वाती राठोड यांनी तर आभार डॉ रुची चौरसिया यांनी मानलेत.
        यावेळी प्रा. डॉ. गद्रे,डॉ. कल्पना भिसे, डॉ चिंचोळकर,डॉ धांडे,डॉ. धर्माधिकारी, डॉ. देशपांडे,डॉ.श्रीवास,डॉ. प्रवीण महानकर,डॉ. डॉ. तराळे,डॉ.अपर्णा वाकोडे,डॉ. वैशाली डोसे, डॉ.सारडा,डॉ.माधुरी माने,डॉ. शाकिब, डॉ. मिश्रा समवेत विद्यार्थी व कॉलेजच्या अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
००००००००००००००००००००००००

SUPER NEWS 24    
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार

                  संवाद : 9371854706
        हत्वपूर्ण सकारात्मक बातम्या व आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्य, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी ...

Follow this link to join my WhatsApp group or contact 9371854706



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...