मुख्य सामग्रीवर वगळा

शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; महसूल विभागाचा आदेश निर्गमित

     अकोला महानगरासाठी      स्वतंत्र अपर तहसील             कार्यालयास मंजुरी
   आमदार रणधीर सावरकर यांनी मानले    मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांचे आभार
 शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय;   महसूल विभागाचा आदेश निर्गमित
अकोला : अकोला महानगरपालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यास अखेर शासनाने मंजुरी दिली असून, यासंदर्भातील आकृतीबंधालाही हिरवा कंदील मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २ एप्रिल २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून या महत्त्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
     अकोला तहसील कार्यालयाच्या पुनर्रचनेद्वारे महानगरपालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी सातत्याने लावून धरली होती. 
        यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने या मागणीला यश आले आहे. 
       अकोला तालुका हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून त्यात शहरी व ग्रामीण असे दोन्ही भाग समाविष्ट आहेत. अकोला महानगरपालिका क्षेत्रासह एकूण २०३ महसूल गावे या तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतात. २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या सुमारे २ लाख ३३ हजार ७४८ असून महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या ५ लाखांपेक्षा अधिक आहे. 
  ‌‌  त्यामुळे वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र अपर तहसील कार्यालयाची गरज निर्माण झाली होती. सद्यस्थितीत अकोला तहसील कार्यालयातून शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांचे कामकाज हाताळले जात असून संजय गांधी निराधार योजना, निवडणूक विभागासह चार विधानसभा मतदारसंघांचे काम येथे चालते. त्यामुळे कामाचा प्रचंड ताण लक्षात घेता महानगर क्षेत्रासाठी स्वतंत्र कार्यालय उभारण्याची मागणी जोर धरत होती. 
   ‌    आता शासनाने मंजुरी दिल्यामुळे अकोला महानगरातील नागरिकांना महसुली कामांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार असून विविध दाखले व इतर कामे जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच नव्या कार्यालयासाठी भव्य इमारत व स्वतंत्र कक्ष व्यवस्थाही उभारली जाणार आहे. 
        या निर्णयाबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
                  ००००००

SUPER NEWS 24    
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार

                  संवाद : 9371854706
        हत्वपूर्ण सकारात्मक बातम्या व आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्य, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती सतत नाविन्यपूर्ण माहिती मिळविण्यासाठी ...

Follow this link to join my WhatsApp group or contact 9371854706




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...