मुख्य सामग्रीवर वगळा

शिबिरामध्ये आयएएस तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आयएएस करू इच्छिणारे स्वतःचे व्यक्तिमत्व विकास करून घेऊ इच्छिणारे दहा ते वीस या वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

   अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील
सिकची रिसॉर्टमध्ये मिशन 'आयएएस' शिबीर
  (प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे)
अमरावती (विशेष प्रतिनिधी)
येत्या 16 मे ते 22 मे या कालावधीत अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे असलेल्या भव्य अशा सिकची रिसॉर्टमध्ये मिशन आयएएसचे राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर संपन्न होणार आहे. अमरावतीची सुप्रसिद्ध डॉ. पंजाबराव देशमुख  अकादमी व श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय शिबिराचे आयोजन केले आहे.
       या शिबिरामध्ये आयएएस तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आयएएस करू इच्छिणारे स्वतःचे व्यक्तिमत्व विकास करून घेऊ इच्छिणारे दहा ते वीस या वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. 
      या शिबिरात भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी प्रा. पल्लवी नरेशचंद्र काठोळे यांच्याशी
 9823294326 किंवा श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचे श्री सचिन माळकर यांच्याशी 7875713975 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
       अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीचे हे रौप्य  महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त या शिबिराचे आयोजन केले आहे. एवढ्या मोठ्या रिसॉर्टमध्ये शिबीर आयोजित करून संयोजकांनी शिबिरार्थींची राहण्याची भोजनाची व प्रशिक्षणाची नाममात्र शुल्कात  उत्तम व्यवस्था केलेली आहे.
        यापूर्वी मिशन आयएएसमध्ये महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री जे पी डांगे मुख्य सचिव श्री रत्नाकर गायकवाड अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. प्रवीण दराडे प्रवीण परदेशी विभागीय आयुक्त  श्री भास्कर मुंडे श्री दिनेश वाघमारे डॉ.सुधीरकुमार गोयल श्री सूर्यकांत जोग श्री आरुमुगम श्री मधुकर कोकाटे श्री किशोर गजभिये श्री रवींद्र जाधव डॉ. पुरुषोत्तम भापकर श्री मिलिंद म्हैसकर श्रीमती मनीषा वर्मा मनीषा म्हैसकर डी. आर.बनसोड शेखर गायकवाड आस्तिक पांडे किरण गिते रामराव घाडगे नवीनचंद्र रेड्डी अश्विनी जोशी सुरेश खोपडे लक्ष्मीकांत देशमुख महेश शुक्ला राहूल रंजन महिवाल कौस्तुभ दिवेगावकर रामचंद्र कुलकर्णी बारावी फेलचे नायक मनोजकुमार शर्मा या आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांसह 373 आयएएस आयपीएस व राजपत्रित अधिकारी तसेच सोळा विद्यापीठाचे कुलगुरू सहभागी झालेले आहेत. 
        डाॅ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीतर्फे फक्त एक रुपया प्रतिदिन इतक्या अल्प शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गापासून स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. या शुल्कामध्ये पुस्तके तसेच टेस्ट सिरीज या विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. या उपक्रमात महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील 23 हजार 500 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत.
        याशिवाय संस्थेने संपूर्ण भारतात 18000 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या असून एवढ्या मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे. 
         संस्थेने स्पर्धा परीक्षेवर एकंदर 73 पुस्तके प्रकाशित केली असून ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून महाराष्ट्रातील 23 आयएएसचा आकडा हा 100 वर नेऊन पोहोचविला आहे .या कामात अकादमीचा सिंहाचा वाटा आहे. अकादमीमार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात नाममात्र पन्नास रुपये एवढ्या अल्प शुल्कात विद्यार्थ्यांना अभ्यासिका व ग्रंथालयाची सोय करून देण्यात येते.
      त्याचप्रमाणे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची विनामूल्य व्यवस्था तसेच अति गरीब विद्यार्थ्यांना विद्यावेतन देखील देण्यात येते. अशा प्रकारची सुविधा देणारी ही भारतातील एकमेव अकादमी आहे. 
        या सात दिवसाच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची माहिती याशिवाय मुलाखत तंत्र .ग्रुप डिस्कशन . सेवन हॅबिट्स. व्यक्तिमत्व विकास व आयएएस आयपीएस व राजपत्रित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्या जाते.
        या शिबिरामध्ये यावर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय या शिबिरात एक दिवस शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येते त्यामध्ये विद्यार्थ्यांना कलेक्टर ऑफिस कमिश्नर ऑफिस पोलीस आयुक्त कार्यालय डीएसपी कार्यालय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय मनपा आयुक्त कार्यालय तसेच 11 कोटी रुपयांचे स्पर्धा परीक्षा केंद्र या ठिकाणी नेण्यात येऊन त्या त्या आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येते. 
       संस्थेच्या या उपक्रमाला संपूर्ण भारतातून उत्कृष्ट प्रतिसाद असून महाराष्ट्राशिवाय 19 राज्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी  मिशन आय ए एस अंतर्गत काम करीत आहे. संस्थेने आयोजित केलेल्या या कार्याला शिबिराला विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती संस्थेच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आली आहे. 
       •प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
        संचालक मिशन आयएएस             अमरावती. संवाद : 9890967003
          00000000000
००००००००००००००००००००००००

SUPER NEWS 24    
विजय द. केंदरकर, ज्येष्ठ पत्रकार

                  संवाद : 9371854706
        हत्वपूर्ण सकारात्मक बातम्या व आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्य, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती सतत नाविन्यपूर्ण माहिती.. मिळविण्यासाठी

Follow this link to join my WhatsApp group or contact 9371854706

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...