अकोला : हिंदू सुरक्षा सेवा संघ सिद्धपीठ हनुमान गढ़ी अयोध्या (उ.प्र.) संस्था नोंदणी क्रमांक - 234/2021 श्री श्री 1008 महंत राजू दास जी महाराज सिद्धपीठ हनुमान गढ़ी अयोध्या धाम (उ.प्र.)यांनी येथील कट्टर हिंदूत्ववादी कैलाश दांदळे यांची हिंदू सुरक्षा सेवा संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी, (अकोला, महाराष्ट्र.) अलिकडेच नियुक्ती करण्यात आली आहे.
गोरक्षण, धर्म, राष्ट्र, संस्कृती आणि धार्मिक पुस्तकांचे वितरण, सनातन वारसाचे रक्षण, सनातन धर्माचा प्रचार आणि हिंदू ऐक्याला समर्पित,असे या संघटनेचे कार्य आहे. आदरणीय श्री श्री १००८ महंत राजू दास जी महाराज यांनी ही जबाबदारी सोपवली आहे. नियुक्तीचा कालावधी ३१ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२७ असा आहे.
या नियुक्तीबद्दल मनपा प्रभाग १० चे नगरसेवक अनिल गरड, नगरसेविका वैशाली शेळके, नगरसेविका मंजुषा शेळके,नगरसेवक नितीन ताकवाले, ज्येष्ठ पत्रकार विजय केंदरकर, श्री गणेश अथर्वशीर्ष मंडळ, जुनेशहर, जयहिंद चौक अकोला चे सर्वेसर्वा विजय बांडी, किशोर सुदालकर, सुनील काळकोंडे, सुभाष वर्मा, अजय बांडी, मुकुंद भारद्वाज, मुरलीधर कसले, बबन बुलबुले, रघुनाथ अलकरी, विजय माहुरकर, प्रदीप बन्सोड, मदन दिग्रसे, महादेव झापर्डे, पवन आगरकर, राठीजी, विजय धार्मिक, विलास रेलकर, सुभाष नवलखे, विनय कावरे, रविंद्र घाटोळे, सापधारे बन्धु, कवडे बंधु आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा