मुख्य सामग्रीवर वगळा

भारतामधील 22 राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत असून नागपूर व छत्रपती संभाजी नगर येथे सुमारे चार कोटी रुपयांचे प्रशिक्षण सभागृह या संघटनेच्या वतीने बांधण्यात आले आहे.

.    भारतातील २२ राज्यात कार्यरत
घरगुती महिला कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी अकोला जिल्हा संघटनेची स्थापना
अध्यक्षपदी अरुणा लबडे तर सचिवपदी सोनाली मोरे 

       अकोला :  दिवसेंदिवस घरेलू महिला कामगारांच्या समस्या वाढत असून त्यांच्या या समस्या सोडविण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याच्या हेतूने घरेलू कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेची अकोला जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली असून अध्यक्षपदी अरुणा संतोष लबडे यांची तर सचिव पदावर सोनाली योगेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
       सोनाली मोरे व अरुणा लबडे या विविध महिला संघटनांमध्ये कार्यरत असून महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात.
        स्वतंत्र मजदूर युनियनच्या वतीने असंघटित क्षेत्रातील घरगुती कामगारांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यात या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी गणेश उके, सहसचिव दिनेश बोरकर, कार्यकारी सदस्य दादाराव तायडे, पद्माकर वासनिक आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
            अकोला जिल्हा संघटनेच्या कार्यकारणीत पुढील प्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उपाध्यक्ष हर्षदा खंडारे, सहसचिव प्रगती देशमुख, सीमा लबडे, कोषाध्यक्ष सुनिता कंकाळ, सल्लागार गोरा नरेलू यांच्यासह सदस्य पदावर वंदना कांबळे, कल्पना अंसावर, अंबिका इंगळे, मनीषा गायकवाड, वैशाली भिवटकर, ज्योती पवार, यांची निवड करण्यात आली आहे.
        सुनिता जाधव यांची मुर्तीजापुर तालुकाप्रमुख म्हणून तर सविता चव्हाण यांची बार्शीटाकळी तालुका प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 
       भारतामधील 22 राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत असून नागपूर व छत्रपती संभाजी नगर येथे सुमारे चार कोटी रुपयांचे प्रशिक्षण सभागृह या संघटनेच्या वतीने बांधण्यात आले आहे. जास्तीत जास्त कामगारांनी या संघटनेचे सदस्य होऊन देशातील बहुजन समाजातील कष्टकरी कामगारांनी या युनियन ची ताकद वाढवावी व आपल्या समस्या सोडविण्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ निर्माण करावे असे आवाहन अध्यक्षा अरुणा लबडे व सचिव सोनाली मोरे यांनी केले आहे.            बिल्डिंग पेंटर, बांधकाम व इतरही असंघटित मजूर संघाचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांचे मार्गदर्शन या संघटनेच्या कार्यासाठी लाभणार आहे.
--------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...