महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अकोला विभागाच्या कामगार कल्याण समिती तर्फे आयोजित ५३ वी आंतरविभागीय नाट्यस्पर्धा २०२५-२६, दि. १५ ते १८ डिसेंबर 2025 या कालावधीत होणार आहे.
•अकोला येथे ५३ वी आंतरविभागीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
•एस.टी. कामगार कल्याण समितीच्या आयोजनाखाली १५ ते १८ डिसेंबर दरम्यान प्राथमिक फेरी
अकोला :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अकोला विभागाच्या कामगार कल्याण समिती तर्फे आयोजित ५३ वी आंतरविभागीय नाट्यस्पर्धा २०२५-२६, दि. १५ ते १८ डिसेंबर 2025 या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रमिलाताई ओक हॉल, नवीन बस स्थानकासमोर, अकोला येथे पार पडणार आहे. उद्घाटक म्हणून मा. डॉ. गजानन नारे (संस्थापक संचालक, प्रभात किड्स स्कूल, अकोला) उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. रोहन पलंगे (प्रादेशिक व्यवस्थापक, नियंत्रण समिती क्र.५, रा.प. अमरावती प्रदेश) असतील. प्रमुख पाहुण्यांमध्ये मा. श्री. राजेश कोनवडेकर (मुख्य कामगार अधिकारी) आणि मा. सौ. वैशालीताई नवघरे (एमएसआरटीसी मध्यवर्ती कार्यालय, मुंबई; प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, अकोला) यांची उपस्थिती लाभणार आहे. विनीत म्हणून श्री. विलास राठोड (विभाग नियंत्रक, रा.प. अकोला विभाग) कार्यभार सांभाळतील. प्रयोगांची वेळ: दररोज सायंकाळी ७.०० वाजता प्रमिलाताई ओक हॉल, नवीन बस स्थानकासमोर, अकोला
*प्राथमिक फेरीचे नाट्यप्रयोग वेळापत्रक*
> 15/12/2025 – ‘एक कप चहा साठी’ लेखक: प्रल्हाद जाधव | दिग्दर्शक: अभिजीत कोल्हापुरे | विभाग: कोल्हापूर
> 16/12/2025 – ‘सलवा जुडूम’ लेखक: इरफान मुजावर | दिग्दर्शक: विजय मोरे | विभाग: सातारा
> 17/12/2025 – ‘नटसम्राट’ लेखक: वि.वा. शिरवाडकर | दिग्दर्शक: रमेश सोनवणे | विभाग: छत्रपती संभाजीनगर
> 18/12/2025 – ‘मी इतिहास गाडला नाही’ लेखक: सुहास भोळे | दिग्दर्शक: अशोक बनसोडे | विभाग: सोलापूर
अकोल्यातील नाट्यरसिकांसाठी ही स्पर्धा सांस्कृतिक आनंदाची पर्वणी ठरणार असून १५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या प्रयोगांना मोठ्या उत्साहाची अपेक्षा आहे.
SUPPER NEWS-24
महत्वपूर्ण सकारात्मक बातम्या व आंतरराष्ट्रीय बातम्या, स्पर्धा परीक्षा, IAS मिशन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, राशीभविष्य, कलावंत, चित्रपट, नाटक, संगित, माहितीपूर्ण लेख, धार्मिक, निसर्ग पर्यटन, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त, जीवनशैली, प्रवास, फॅशन, खाद्य, तंत्रज्ञान, विशिष्ट छंद, आयुर्वेद, भ्रमंती सतत नाविन्यपूर्ण माहिती..
email:
रहा कनेक्ट-
जाहिरातीसाठी संपर्क -
मुख्य संपादक
SUPER NEWS 24
संवाद : 9371854706
🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/ GTb19FbwSXr0SMaDJdKAvc

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा